आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील डॉ. सार्थक किशोर हिंगलासपुरे याने BDS ची पदवी भारतातील नामवंत नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई येथून मुलांमधून प्रथम तर कॉलेज मधून द्वितीय क्रमांक घेऊन पूर्ण केली. एवढेच नव्हे तर त्याने ओरल मेडिसिन ऍण्ड रेडिओलॉजी ( मुखरोग औषधोपचार व क्ष- किरण विभाग) या विषयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सोबतच तीन विषयात त्याने प्राविण्यही मिळविले आहे.त्याच्या कुटुंबातील तों पहिला डॉक्टर आहे.त्यामुळे त्याच्यावर सर्वाकडून कौतुकाचा वर्षाव होतं आहे. गांधी विद्यालयातील पर्यवेक्षिका सौ. अजमिरे मॅडम यांचा तों मुलगा आहे. आपल्या यशाचे श्रेय तों आई वडील आजी, आजोबा श्री मोरूभाऊ अजमिरे व नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई मधील सर्व प्राध्यापक वर्गाला देत आहे. तसेच आर्वीतील डॉ. सार्थक हिंगलासपुरे यांनी मानाचा तुरा रोहल्याबद्दल सर्व समाज माध्यमावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.















