धामणगाव रेल्वे येथे बहुजन समाज पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे : बहुजन समाज पार्टीच्या वतीने धामणगाव रेल्वे विधानसभा स्तरावरील महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन रविवार, दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्राम गृह, धामणगाव रेल्वे येथे करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये आगामी राजकीय दिशा, संघटन मजबुतीकरण तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
बैठकीस नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील सर्व विधानसभा पदाधिकारी, शहर, सेक्टर व बूथ स्तरावरील पदाधिकारी, तसेच आजी-माजी पदाधिकारी व पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील तसेच अमरावती जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲड. लौकिक डोंगरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती धामणगाव रेल्वे विधानसभा अध्यक्ष योगेंद्र पाटील यांनी दिली असून, सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad