महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी जयंती.

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसांत योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस सामजिक न्याय विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मध्य व पश्चिम रेल्वे, एसटी महामंडळ आणि इतर संबंधित शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad