डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान अंतर्गत वार्षिक बैठक संपन्न.

0
38
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनसिंगी. दिनांक 15 मार्च 2026 ला पद्माकर वहिले धामणगाव रेल्वे यांच्याकडे डॉ .बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान या धार्मिक व सामाजिक संघटनेची वार्षिक बैठक संपन्न झाली त्या अंतर्गत वर्षभर होत असलेल्या अभियान कार्यक्रमा नियोजन बाबत मीटिंग घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमच्या अध्येक्षस्थानी अभियांनाच्या मार्गदर्शिका प्रा.इंदुताई नारनवरे , तर मार्गदर्शक म्हणूनअभियान प्रमुख जगदीश शिंदे,यांच्या हस्ते महामानवाच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

डॉ .बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान मध्ये दरवर्षी जे श्रामनेर शिबीर घेत असतो ते शिबीर कुठे घ्यायचं आहे याबाबत ठरविण्यात आले. श्रमनेर शिबिरा् सोबत धम्म कार्यशाळा पण घेण्यात यावी. असे सुचविण्यात आले. त्यानंतर प्रेत्येक तालुक्या मध्ये अभियान पोहचले पाहिजे प्रेत्येक तालुक्याच्या ठिकाणी संघटन असले पाहिजे यासाठी सूचना देण्यात आल्या.
बुध्दा धम्माचे कार्य घराघरात पोहचवीन्याचे काम अभियान मार्फत काम केले पाहिजे.

आपण सर्वांनी अभियान हे आपले समजून ते घराघरात कसे पोहचविणार या साठी सर्वाणी एकजुटीने काम करावे. मनात कुठल्याही बाबतीत शंका कुशका घेऊ नये. संपूर्ण महाराष्ट्र भर अभियान पोहचले पाहिजे असे प्रतिपादन अभियान प्रमुख जगदीश शिंदे यांनी मांडले. यावेळी अभियान मधील अभियान सचिव रविंद्र कांबळे, डॉ अमोल श्रीरामे, प्रा. डॉ मिलिंद गजभिये, जिल्हा प्रमुख यवतमाळ सुनील शिंदे, बंडु आठवले, अभियान प्रसिद्धी प्रमुख पदमाकर वाहिले,महिला संघटिका पपीता मनोहरे,मृदुलता हेरोडे, प्रतिभा डोंगरे, बेबी जामनिक, सिंधू लोखंडे, तिवसा तालुका प्रमुख बंडूभाऊ ढोणे, आर्वी तालुका प्रमुख मायाताई काळबांडे, दक्ष शिंदे,यासहा अभियानाचे प्रमुख पदाधिकारी सदस्य उपस्तित होते.

veer nayak

Google Ad