आदर्श शिक्षक अंबादास जाधव सरांचा जळगाव (मं.) शाळेत निरोप समारंभ

0
108

जळगाव (मं.) : जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जळगाव (मं.) येथील पदवीधर विषय शिक्षक श्री. अंबादासजी जाधव सर यांची समायोजन प्रक्रियेतून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निंबोली येथे बदली झाल्याने शाळेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.

मागील आठ वर्षांपासून जळगाव (मं.) येथे कार्यरत असलेले जाधव सर हे विद्यार्थ्यांचे प्रिय आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळखले जात होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. गावातील पालक व ग्रामस्थांशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यामुळे अनेक माजी विद्यार्थी देखील त्यांना भेटण्यासाठी शाळेत येत असत.

शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक सहली तसेच विविध शालेय उपक्रमांमध्ये जाधव सरांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांनी तयार केलेले लेझीम पथक यावर्षी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर निवडले गेले होते. दरवर्षी लेझीमद्वारे विविध देखावे सादर करून त्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीपभाऊ निर्मळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. विलासभाऊ धनविज, समिती सदस्य श्री. सुनीलभाऊ कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाचक मॅडम, सहशिक्षक श्री. देशमुख सर तसेच सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेतून जाताना जाधव सरांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचप्रमाणे सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचाही कंठ दाटून आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

veer nayak

Google Ad