अमरावती प्रतिनिधी
शिंपी समाजाचे 22 फेब्रुवारी रविवारी रोजी नागपूर येथे रेशीम बाग येथे ऐतिहासिक मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन होणार असून संपूर्ण भारतातील शिंपी समाजातील सर्व पोट जाती एकत्र येत आहेत या महासंमेलनाला राम किशोरजी शिपा राजस्थान पद्मश्री कानुबाई टेलर, गुजरात प्रवीण भाई, दर्जी गुजरात आणि संत मंडळी राजकीय समाज बंधु भजनी मंडळ यांचा सहभाग होणार आहे या कार्यक्रमाला देश पातळीवरील सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून संत नामदेव महाराज ईश्वर रत्न पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सडक परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय भारत सरकार यांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष भास्कर टोम्पे मुख्य संयोजक ईश्वर धिरडे अनंत जोगदंड अविनाश ताटे सारंग गचके नरेश रामगिरी नितीन ईश्वरी रामदास खोडे यांनी आज पत्रकार परिषद माहिती दिली भास्कर टोम्पे पुढे म्हणाले कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री ना. शिवराज सिंह चव्हाण केंद्रीय कृषिमंत्री प्रल्हाद जोशी उपभोक्ता मामले आणि सार्वजनिक वितरण तथा नवीन आणि नवीन करणीय ऊर्जा मंत्री भारत सरकार खासदार प्रणिती शिंदे सोलापूर संजय महार अध्यक्ष सरहद संस्था पुणे खासदार अनिल बोंडे मा.आ. संजयजी खोडके ,माजी आमदार सौ सुलभाताई खोडके, अमरावती आमदार रवी राणा बडनेरा, खासदार नवनीत राणा अभिनेते गोविंदा नामदेव यांच्यासह संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे संत मंडळी हरिभक्त परायण जितेंद्रनाथ महाराज स्वामी ,गोविंद गिरी महाराज सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज ,समाजाच्या विषयी मुख्याधिकारी समाजातील सर्व राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये समाजाच्या प्रमुख मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार आहेत त्यानुसार
1) संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव राष्ट्रीय महापुरुष व संतांच्या यादीमध्ये समाविष्ट करावे.
2) पंढरपूर येथे होत असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारकाला भरीव निधी मंजुर काम प्रत्यक्षात सुरू करणे.
3) जातिवंत शिंपी विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती जाहीर करणे व जिल्हा किंवा शहर पातळीवर विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता संत शिरोमणी नामदेव महाराज वसाहती गृहाची स्थापना करणे.
4) MIDC क्लस्टर झोनमध्ये शिंपी उद्योगांकरिता प्लाट राखीव ठेवून त्या करिता सुविधा उपलब्ध करून देणे
5) नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात सरकारी इमारतीमध्ये जाती वतं शिंपी करिता गाळे राखीव ठेवणे.
6) जातिवंत शिंपी महिला व युती करिता सर्व क्षेत्रात विशेष सुविधा व सशक्त करण्याचे प्रयत्न करणे.
7) राजकीय क्षेत्रामध्ये जातीवंत शिष्यांना संकेप्रमाणे सामावून घेणे इत्यादी प्रमुख मागण्या आहेत..









