धामणगाव रेल्वे,
उत्तम राष्ट्र उत्कृष्ट राष्ट्रभक्ती आणि पराक्रमी बलाढ्य समाज उभा व्हावा हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे आणि हीच गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात ठरवलेली आहे की या राष्ट्राला समाजातील संपूर्ण घटकांनी म्हणजेच सर्वसमावेशक हिंदूंनी आगामी वर्षात परम वैभव प्राप्त करून द्यायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख शैलेश पोद्दार यांनी येथे व्यक्त केले ते महाराणा प्रताप वस्ती च्या सकल हिंदू संमेलन कार्यक्रमात बोलत होते.


याप्रसंगी मंचावर कीर्तनकार ऋषिकाताई पिंगळे, संयोजक हरीश अग्रवाल सहसंयोजक शंकर नेवारे उपस्थित होते. आमच्या संघर्षाची, पराक्रमाची गाथा आहे परंतु इतके वर्ष संघर्ष केल्यानंतर जी ग्लानी येते जो थकवा येतो दीडशे वर्ष ज्या ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांनी या देशांमध्ये दोन गोष्टी केल्या एक या देशातल्या लोकांचे मूळ सत्व आहे त्या सत्वावरच आघात केला आणि हिंदू आहोत याच्या विषयी आपल्या मनामध्ये न्यूनगंड उत्पन्न झाला पाहिजे अशा पद्धतीची एक स्थिती आपल्या देशामध्ये उत्पन्न केली आणि तेच आम्ही आजही आमच्या नवीन पिढीमध्ये देखील बघत आहोत ज्या वेळेला डॉक्टर हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करत होते त्यावेळेला या देशांमध्ये काय स्थिती होती त्यावेळेला लोक म्हणायची आम्हाला गधा म्हणा पण हिंदू म्हणू नका याचं कारण एक वातावरण असं बनलेलं होतं राजकीय स्थिती अशी बनत चाललेली होती ही सगळ्यांनी मिली जुली संस्कृती पाहिली पाहिजे आणि या राजकीय वातावरणामध्ये स्वतःला हिंदू जर कोणी बनवून घेत असेल तर त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये संकोच होतं हे वातावरण डॉक्टर हेडगेवार यांनी बघितले जो मूळ इथला हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाने आपले चैतन्य विसरलेला आहे या हिंदू समाजामध्ये स्वतःला आम्ही कोण आहोत याच्या विषयी तिसर पडलेला आहे की आम्ही किती पराक्रम आहोत किती बलवान आहोत आमच्या मध्ये किती मोठी ज्ञानपरंपरा आहे याचा विसर या हजार वर्षाच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये पडलेला डॉक्टर हेडगेवार यांना दिसत होता म्हणूनच त्यांच्या लक्षात आलं की हिंदू समाजाला पुन्हा एकदा जागा करावा लागेल त्यांच्यामध्ये चैतन्य उभं करावं लागेल त्यांच्यामध्ये त्यांच्या या सर्व एकदा हिंदू बलशाही झाला तरच भारत मातेला परत एकदा आपण ताकतीने उभा करू शकू आणि म्हणून त्यांनी हिंदू समाजाच्या संघटनेच्या कामाला प्रारंभ केला. ते म्हणत मी केशव बळीराम पंत असं सांगतो की हिंदुस्थान हिंदुराष्ट्र आहे जोपर्यंत या हिंदुस्थान मध्ये शेवटचा हिंदू शिल्लक आहे तोपर्यंत हे हिंदू राष्ट्रच आहे कारण आमच्या पूर्वजांची याला अनेक हजार वर्षांची परंपरा आजही आहे भारत हे हिंदू राष्ट्र आहेच बनवायची गरज काही उरलेली नाही फक्त आवश्यकता आहे की हिंदूंना आम्ही कोण होतो याची ओळख करून द्यायची गरज आहे आम्ही हिंदू आहोत म्हणजे काय आहोत हे हिंदू राष्ट्र आहे म्हणजे काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे म्हणजे मनातला संकोच निघून जाणार आम्ही या जगामध्ये सगळ्यात चांगली उन्नत अशी संस्कृती आमच्या देशामध्ये घडवलेली होती.
विचार करा की या देशावर किती आक्रमण झाली जगामध्ये असं कधीही घडलेलं नाही इतकी आक्रमण या भारताने झेललीत त्याचं कारण काय असेल तर ते म्हणजे असंघटित हिंदू म्हणूनच हिंदूंना एकत्रित होऊन संघटन मे शक्ती है हे सिद्ध करावे लागेलच जरा विचार करा की आमचे पूर्व कसे पराक्रमी होते तसेच ज्ञानी होते आम्ही सुद्धा सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ व त्यांचेच वंशज आहोत आणि म्हणून मी जेव्हा सुरुवातीला असं म्हटलं की आता हिंदुंकरिता सर्वोत्तम कालखंड सुरू झालेला आहे हिंदूनी संपूर्ण जगाला सुखाने,शांतीने, समाधानाने कसं राहायचं हे शिकवलं आहे
याप्रसंगी कीर्तनकार ऋषीकाताई पिंगळे आपल्या ओजस्वी वाणी मधून उपस्थित शेकडो महिलांना संबोधन करताना म्हणाल्या की, देव, देश, धर्म वाचवीण्याकरता आई जिजाऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई सारखी राष्ट्रभक्ती आपल्याला स्वीकारावी लागेल हिंदू समाजाचा विरोधी हा कोणी अन्य नसून हिंदूच आहे हिंदूंना हिंदुत्व टिकवायचा असेल तर आपली संस्कार,संस्कृति, आचार, विचार, एकता या सर्व गोष्टी घरात आणि समाजात रुजविणे आवश्यक आहे शिक्षण पद्धतीवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे आम्ही आईला आईच म्हणावं मम्मी म्हणू नये अशा गोष्टी शिशुच्या मनात रुजवाव्या लागेल कारण ही आपली संस्कृति आहे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे शिकवल्या जात नसून अकबर बिरबल यांच्या कहाण्या शिकवल्या जातात कसा हिंदू समाज टिकून राहील याचाही विचार व्हावा असे त्या म्हणाल्या हिंदूंचा सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ भगवद्गीता अनेक हिंदूंच्या घरी नाहीत ही शोकांतिका आहे त्या म्हणाल्या की, मैं भारत की बेटी तुम्हे जगाने आई हु,घर घर मे इन्कलाब लाने आई हु, तू काली बन तू दुर्गा बन …
संमेलनाचे संचालन व परिचय धामणगाव शहरातील नावाजलेल्या निवेदिका तसेच धर्म जागरण कार्यकारणी सदस्य सौ.रोशनी मुंदडा प्रास्ताविक सौ. नीतू शिलार व आभार धर्म जागरणच्या सौ.मधु राठी यांनी मानलेत वंदे मातरम आणि पंडित तरुण दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत माता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली














