चांदुर रेल्वे येथील अतुल जगताप विद्यालयाचे दहावी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप तळोकार होते प्रमुख अतिथी म्हणून राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सुरेंद्र वाणी व ज्येष्ठ शिक्षक काकडे , धोटे , प्रताप बोदिले व मेश्राम सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाहूराज वानरे, लावण्य शिदोळकर, गौरी राऊत, समीक्षा बावने श्रुतिका परतेती, वैष्णवी सोळंके ,विशाखा उके यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षक हरिदास धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक तळोकार यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला कठोर परिश्रम करून समोर यश तुमच्या पदरी पडेल असे सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुरेंद्र वाणी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले प्रास्ताविक प्रताप बोदिले यांनी केले तर संचालन चेतन मस्के व परिणीती भोंडे व आभार काकडे सर यांनी मानले कार्यक्रमाला दहावी, आठवी, नववी, विद्यार्थ्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते













