1;39 कोटीची नळ पाणीपुरवठा योजना मात्र गाव अजून ही पाणी विन. निष्कृष्ट कामामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेचा फज्जा. जिल्हाधिकारी कडे निवेदनाद्वारे दोषीवर कारवाईची मागणी 

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

1;39 कोटीची नळ पाणीपुरवठा योजना मात्र गाव अजून ही पाणी विना

 

चांदूर रेल्वे/ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत आमला विश्वेश्वर ग्रामपंचायत साठी मंजूर करण्यात आलेली तब्बल 1 कोटी 39 लाख 51 हजार 208 रुपयाची नळ पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणी देण्यात पूर्णता अपयशी ठरली आहे,योजना पूर्ण झाल्याचा अधिकृत अहवाल असतानाही आजतगत गावाच्या टोकावर पाणी गेलेले नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ प्रवीण उद्धवराव बकाले सह गावातील नागरिकांनी केलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी ता 9 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कडे केली आहे,

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत आमला विश्वेश्वर नळ पाणीपुरवठा योजना 2019 मध्य मंजूर झाली, एका कन्ट्रक्शन कंपनी यांच्याकडून या योजनेचे काम करण्यात आले योजना सन 2023 मध्ये पूर्ण झाल्याचे हस्तांतरण अहवालात नामूद करून ती ग्रामपंचायत कडे सोपवण्यात आली मात्र या हस्तांतरण अहवालात हस्तांतरणाची तारीख स्पष्ट नाही ही बाब संशयात पद असल्याचे तक्रारीत नमूद आहे,

या योजनेचे पाणी आज पर्यंत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीपर्यंत पोहोचलेले नाही त्यामुळे तीन महिने ट्रायल घेण्यात आल्याचा दावा पूर्णता खोटा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पाणी टाकीवर चढवण्याचा प्रयत्न केला असता पाईपलाईन तुटत असल्याने कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते कमी प्रतीचे पाईप वापरण्यात आल्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च ग्रामपंचायतीवर येत असून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे, गावात आजही तीन,चार दिवसानंतर एक वेळा पाणीपुरवठा होतो, त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागवण्याकरिता भटकंती करावी लागत आहे,

या योजनेवर शासनाचा कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने संपूर्ण खर्च वाया गेल्याचा आरोप तक्रार कर्त्यांनी केला आहे, तसेच ही योजना मंजूर इस्टिमेट व करारातील अटी शर्ती प्रमाणे राबवण्यात आलेली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे,सदर योजनेतील पंपिंग नलिका पाईप सह संपूर्ण कामाचे गुणवत्ता गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत पंचा समक्ष तपासणी करण्यात यावी,चौकशीत दोषी आढळणाऱ्या योजना हस्तांतरित करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी वर बंडतर्फे ची कारवाई करून त्यांच्याकडून उपहाराची रक्कम वसूल करावी, तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय सदर योजनेचे काम करणाऱ्या कंपनी ला काळे यादी टाकण्यात यावे व संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी प्रवीण बकाले सह गावातील नागरिकांनी लेखी तक्रारीतून केली आहे, या अगोदर हेच निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद विभाग अमरावती यांच्याकडे ता 9 डिसेंबर 2025 रोजी तक्रार करण्यात आली होती, मात्र तिथे कोणती दखल न घेतल्यामुळे पुन्हा गावातील नागरिकांनी ता 9 सोमवार सोमवार रोजी हे तक्रार जिल्हा अधिकारी अमरावती यांच्याकडे करण्यात आली, निवेदन देतेवेळी प्रवीण बकाले सह गावातील अनेक नागरिक या वेळी Jay हजर होते,

veer nayak

Google Ad