धानोरा माली (ता. चांदूर रेल्वे) :
भौतिकशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तकग्राम धानोरा माली येथे शैक्षणिक व विज्ञान प्रसार उपक्रमांतर्गत दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘जर्नी टू स्पेस’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा. एस. ए. वाणी होते. कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रवीण गुल्हाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हौशी खगोल अभ्यासक श्री. विजयजी गिरोळकर, श्री. वैभवजी अनासने (सदस्य, मराठी विज्ञान परिषद), सौ. गायत्री वाणी, डॉ. अश्विन पाचकवडे, प्रा. मधुकर हांडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन संतापे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या सदस्य डॉ. रोशनी भगत यांनी केली.
यानंतर स्लाईड शो व दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख वक्ते श्री. प्रवीण गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची रंजक व उपयुक्त माहिती दिली. खगोल अभ्यासक श्री. विजयजी गिरोळकर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून अंतराळ विश्वाची सविस्तर माहिती सादर करत विद्यार्थ्यांना अवकाश सफरीचा अनुभव दिला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली. दुर्बिणीद्वारे ग्रह व तारे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी भारावून गेले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, भौतिकशास्त्र विभागातील बी.एस्सी.चे विद्यार्थी तसेच धानोरा माली गावातील नागरिक व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.












