भातकुली -उत्तमराव रौराळे फाउंडेशन द्वारा संचालित भातकुली तालुक्यातील सायत येथील इंग्रजी माध्यमातील सुप्रसिद्ध असे शलाका विद्यामंदिर येथील वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 29 जानेवारी रोजी उत्साहात साजरे करण्यात आले. स्नेहा संमेलनाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव रावजी सोनवणे अध्यक्ष राजश्री शाहू विद्या प्रसारक मंडळ तथा माजी नगरसेवक उल्हासनगर यांनी केले



कार्यक्रमाचे अध्यक्ष जी के राऊत सेवानिवृत्त सहसचिव कृषी विभाग, तर प्रमुख अतिथी डॉक्टर राजेश उताणे, सुनील बसवंत, डी आर जामनिक, सरला ताई इंगळे, दीपक समदुरे, व डॉक्टर गणेश इंगळे हे होते. विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक नृत्य व नाट्य सादर केले. त्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य व पराक्रम, कृष्ण राधा चे पवित्र प्रेम व विरह, सैनिकांची व्यथा, नारी शक्ती असे ज्वलंत विषय घेऊन विद्यार्थ्यांनी अप्रतिम रित्या सादरीकरण करून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. महाकाली च्या नृत्यात महाकालीचा रुद्र अवतार बघून प्रेक्षकांना शहारेच आले; यासह नर्सरी के जी, या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद होता, राज्यातील अनेक लोकनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शलाका विद्यामंदिराची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, “सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” याद्वारे आयोजित राष्ट्रगीत चा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शलाका विद्यामंदिर सहभागी होऊन, भारतातल्या १०० उत्तम शाळेपैकी एक असा दर्जा सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांनी त्यांना दिलेला आहे, राष्ट्र पातळीवरील घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत या विद्या मंदिरातील तीन विद्यार्थी अनुक्रमे पहिला, तिसरा व सहावा क्रमांक मिळवला आहे, पुढील विद्यालयाचे नाव चमकत राहण्यासाठी सर्व शिक्षक वृंद प्रयत्न करतील, असे आश्वासन विद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राखी मेश्राम यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका भाग्यश्री ठाकरे, भक्ती जावरकर, दिव्यानी इंगळे, वैष्णवी मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा वलिवकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब रौराळे, कार्यकारी अध्यक्ष निदान वर्धे, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राखी मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाले. सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली. या विद्यालयातील स्नेहसंमेलनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












