अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा; शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

0
17

अमरावती | दि. 28 जानेवारी 2026

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युरिया खताचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रब्बी हंगामातील पिके निर्णायक टप्प्यात असताना खताअभावी उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून, अनेक ठिकाणी युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच युरिया खत देताना इतर खत किंवा औषधे घेण्याची सक्ती (लिंकिंग) केल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे पोहोचल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ युरिया पुरवठा व लिंकिंगवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हास्तरावर शेतकरी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

उपस्थित पदाधिकारी – विक्की भगत, मुकेश ठवकर, शिवा सोनोने, बबन सोनोने

veer nayak

Google Ad