आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आज दि. १६/०१/२०२६ ला आर्वी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून भाजप पक्षाचे गौरव जाजू तर स्वीकृत सदस्य म्हणून प्रशांत ठाकूर, सुनील बाजपेयी यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.

तसेच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट युतीचे स्वीकृत सदस्य म्हणून सादिक कादर (जुनेवाले) यांची निवड करण्यात आली आहे.

निवड करण्यात आलेल्या सदस्यांचे न.प. मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड व नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती गुल्हाने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच निवड झालेल्या सदस्यांनवर आर्वी शहरात भरभरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
भाजपचे एकूण १४ नगरसेवक निवडून आले हाेते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट १ निवडून आले हाेते. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १ निवडून आले हाेते. व ७ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट तर २ काँग्रेसचे असे एकूण ९ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट युतीचे नगरसेवक निवडून आले हाेते. यापैकी २ भाजपला स्वीकृत सदस्य मिळाले तर १ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना स्थान मिळाले. नगरपालिकेत असे एकूण ३ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे प्रा. पंकज वाघमारे अशी यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच भाजपचे नगरसेवक संजय थोरात यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे.











