चांदूर रेल्वे/ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत आमला विश्वेश्वर ग्रामपंचायत साठी मंजूर करण्यात आलेली तब्बल 1 कोटी 39 लाख 51 हजार 208 रुपयाची नळ पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणी देण्यात पूर्णता अपयशी ठरली आहे,योजना पूर्ण झाल्याचा अधिकृत अहवाल असतानाही आजतगत गावाच्या टोकावर पाणी गेलेले नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ प्रवीण उद्धवराव बकाले यांनी केलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे,
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत आमला विश्वेश्वर नळ पाणीपुरवठा योजना 2019 मध्य मंजूर झाली होती,ओ बी सानप कन्ट्रक्शन कंपनी जालना यांच्याकडून या योजनेचे काम करण्यात आले योजना सन 2023 मध्ये पूर्ण झाल्याचे हस्तांतरण अहवालात नामूद करून ती ग्रामपंचायत कडे सोपवण्यात आली मात्र या हस्तांतरण अहवालात हस्तांतरणाची तारीख स्पष्ट नाही ही बाब संशयात पद असल्याचे तक्रारीत नमूद आहे,
या योजनेचे पाणी आज पर्यंत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीपर्यंत पोहोचलेले नाही त्यामुळे तीन महिने ट्रायल घेण्यात आल्याचा दावा पूर्णता खोटा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पाणी टाकीवर चढवण्याचा प्रयत्न केला असता पाईपलाईन तुटत असल्याने कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते कमी प्रतीचे पाईप वापरण्यात आल्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च ग्रामपंचायतीवर येत असून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे,
या योजनेवर शासनाचा कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने संपूर्ण खर्च वाया गेल्याचा आरोप तक्रार कर्त्यांनी केला आहे, तसेच ही योजना मंजू इस्टिमेट व करारातील अटी शर्ती प्रमाणे राबवण्यात आलेली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे, सदर योजनेतील पंपिंग नलिका पाईप सह संपूर्ण कामाचे गुणवत्ता गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत पंचा समक्ष तपासणी करण्यात यावी,चौकशीत दोषी आढळणाऱ्या योजना हस्तांतरित करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी वर बंडतर्फे ची कारवाई करून त्यांच्याकडून उपहाराची रक्कम वसूल करावी, तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय सदर योजनेचे काम करणाऱ्या ओबी सानप कंट्रक्शन कंपनी जालना यांना काळे यादी टाकण्यात यावे व संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी प्रवीण बकाले यांनी लेखी तक्रारीतून केली आहे या तक्रारीची प्रत राज्याचे मुख्यमंत्री पाणीपुरवठा मंत्री व ग्राम विकास मंत्री यांना पाठवण्यात आली आहे,
पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येते मात्र ज्यावेळी पाईपलाईन फुटते त्यावेळेस टाकेपर्यंत पाणी जात नाही आम्ही किती वेळा पाईपलाईन जोडून दिली आहे महत्त्वाचे म्हणजे सदर योजना ज्यावेळी झाली होती त्यावेळी मी कार्यरत नव्हतो,
संजय घाणेकर उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग चांदुर रेल्वे









