स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकसहभागातून डॉ.सतीश इंगळे अमरावती यांच्या सहकार्याने दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.



शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद ऊईके,शा.व्य.स. अध्यक्ष प्रमुख पाहुणे सरपंचा सौ.चंदाताई जांभळे, गटविकास अधिकारी डॉ.प्रफुल्ल भोरखडे , गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तायडे, डॉ. सतीश इंगळे, उपसरपंच संदीप इंगळे, गटसमन्वयक धिरज जवळकार, साधन व्यक्ती शेषराव चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे शाळा व ग्रामपंचायत तर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ.प्रफुल्ल भोरखडे व गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.सतीश इंगळे दानदाते व उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन निलेश मोहकार तर प्रास्ताविक मुख्याध्यापक महेंद्र जाधव व आभार मीना ठाकरे यांनी केले.















