परसोडी : येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी पोलीस पाटील निलेश गावंडे, संजय शिंदे, शुभ करण पाटील, पुष्पा गावंडे, कल्पनाताई सपाटे, अनिताताई परिमल, जनार्दन गोमोसे व कवीता धावळे आदी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, महिला सक्षमीकरण व समाजसुधारणेतील कार्यावर मार्गदर्शन केले. महिलांनी व विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
















