बाळा जगताप साठी खासदार अमर काळे आतापर्यंत विषारी अचानक बिंनबुळाच्या युतीतून बाळा जगतापच्या पत्नीला उमेदवारीतून अमृताचा प्याला कसा व का ?

0
119
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

काँग्रेस व राष्ट्रवादीची बिन बुडाच्या युतीतून काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मची का केली हेराफेरी

आर्वी,प्रतिनिधी/

आर्वी : विधानसभेच्या निवडणुकीत बाळा जगताप यांनी विषारी टीका करत मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त केले होते. परंतु विषारी व्यक्ती अमृत कशी होऊ शकते हा देखील एक संशोधनाचा भाग आहे सहा आठ महिन्यातच अमर काळे व बाळा जगताप यांची बिनबुडाच्या युतीतुन मैत्री कशी झाली बाळा जगताप यांना विधानसभेची तिकीट न दिल्यामुळे अमर काळे त्यांच्यासाठी आतापर्यंत मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत विषारी होते आता मात्र काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म ची गफलत करून काँग्रेस पक्षा सोबत धोक्याने केलेल्या युतीतुन बाळा जगताप यांच्या म्हणण्यानुसार विषारी व्यक्तीने बाळा जगताप यांच्या पत्नीला अमृताचा प्याला अचानक दिला कसा यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नगर परिषदेच्या बाबतीत जे कोणी निवडणुकीत दिग्गज उतरले त्यांचं राजकीय कारकीर्द संपुष्टात आलेल आहे असे दिसते हे ही तेवढेच एक सत्य आहे. बाळा जगताप यांच्या पत्नीला नगरपरिषदेची बिन बुडाच्या काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युतीच तिकीट देऊन राजकारणातून संपायचं तर नाही ना? अशी ही शहरात चर्चा होत आहे.

 

वर्धा जिल्हा प्रभारी मा. राजेंद्र मुळक यांची नागपूर येथे आर्वी येथील स्थानिक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व मी स्वतः भेट घेतली असता पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाचे एबी फॉर्म हे काँग्रेस शहराध्यक्षाकडे द्यायला पाहिजे होते असे राजेंद्र मुळक यांनी सांगितले. परंतु नामांकन अर्ज दाखल करण्या ऐन वेळेपर्यंत पक्षाचे एबी फॉर्म काँग्रेस शहराध्यक्षाकडे पोहोचू शकले नाही. माझ्या नेतृत्वावर काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवून सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु अशा जिल्हाध्यक्षाच्या नापरवाहीमुळे या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उभे केलेले उमेदवार या निवडणुकीच्या प्रक्रियेतून वंचित राहीले. या घडलेल्या प्रकरणाची मला खंत आहे मी त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांने पक्षाचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे जिल्हाध्यक्षाची सदर तक्रार मा. राजेंद्र मुळक जिल्हाप्रभारी तसेच प्रदेश अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांचेकडे केलेली आहे.

अनंत दादा मोहोड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (प्रदेश महासचिव)

veer nayak

Google Ad