शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

0
28
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

     अमरावती, दि. 20 अमरावती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या 5 लाख 69 हजार शेतकऱ्यांच्या मदतीचा महत्त्वपूर्ण डेटा ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केला आहे. या नुकसानीपोटी आतापर्यंत 542 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी सुविधा पूर्ववत सुरू झाली असल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ आधार कार्डसह आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

 

      तसेच, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं. 7/12 उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा. जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनानुसार, सर्व शेतकऱ्यांनी तातडीने या प्रक्रिया पूर्ण करून पुढील शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad