नगरपरिषद च्या तिजोरीत 23 लक्ष 84 हजार 855 रु कर च्या स्वरूपात जमा लागलं,
चांदुर रेल्वे / नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे उमेदवाराकडून थकबाकी राहिलेले कर च्या (टॅक्स ) स्वरूपात 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत 23 लक्ष 84 हजार 855 रुपये जमा झाले आहे,त्यामुळे नगरपरिषद च्या कर विभागात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली आहे,
नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेची सर्वत्रिक निवडणूक होणार असून उभे असलेले उमेदवारा ला न प मालमत्ता कर पाणीपट्टा कर,स्वच्छतेचा दाखला घेणे बंधनकारक असल्याने मागील फक्त सात दिवसात थकबाकीत असलेले मालमत्ता कर पाणीपट्टा कर च्या स्वरूपात 23 लक्ष 84 हजार 855 रुपये जमा झाले,तर स्वच्छतेचा दाखला च्या स्वरूपात 45 हजार 900 रु जमा झाले,या व्यतिरिक्त ज्या उमेदवाराने ऑफलाइन फॉर्मची उचल केली त्या स्वरूपात तीन हजार चार शे रु असे एकूण 23 लक्ष 84 हजार 855 रु नगर परिषदेच्या कर विभागात जमा झाले आहे,













