भव्य तान्हा पोळा उत्सव २०२५

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री संत बगाजी महाराज यांच्या कृपेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी 2 .०० वाजता श्री संत बगाजी महाराज मंगल कार्यालय, (बगाजी) येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

युवक लहान मंडळ (खुशनवाज मित्र मंडळी) व युवामित्र (खुशनवाज मित्र मंडळी) यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्री. दिलीपरावजी दगडकर(माजी सैनिक) उपस्थित राहणार आहेत.

या भव्य तान्हा पोळा सोहळ्यात लहानग्या बैलांचे सजवून पूजन करण्यात येणार असून, पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. उपस्थित मान्यवर व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक विवेक रमेशराव दगडकर व दगडकर परिवार, व समस्त ग्रामवासी वरूड बगाजी यांनी केले आहे.

विशेष आकर्षण : कार्यक्रमापूर्वी जादूच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बक्षीस वितरण: कार्यक्रमानंतर सजावट, वेशभूषा अशा अनेक बक्षिसाचे वितरण होणार आहे.

✨ हा उत्सव शेतकरी बांधवांसाठी आनंद, श्रद्धा व ऐक्य यांचा संदेश देणारा ठरणार आहे.

veer nayak

Google Ad