दिनांक 1/मे /2025 गुरुवार रोजी आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार विचार )आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेनुसार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे यांच्या आदेशानुसार, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी येथील दिलीप पोटफोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी सात वाजता कामगार दिन व महाराष्ट्र दीना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या लढ्यात हुतात्म्य पतकरणाऱ्या 106 हुतात्म्याना स्मरन करून,वंदन करून – त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली –
तसेच महाराष्ट्र राज्याला खर्या अर्थाने आपल्या परिश्रमातुन प्रगतीकडे नेणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करणाऱ्या कामगारांचा देखील सन्मान करत सत्कार करण्यात आला -यावेळी – गवंडी कामगार राजेशभाऊ येडणे, विजयभाऊ शिरपूरकर, जिनिंग प्रेसिंग कामगार जयंतभाऊ गभने,बांधकाम कामगार गणेशभाऊ मुने.श्रीधरभाऊ चतुर, गजाननभाऊ अतकरी, आरोग्य विभागात कंत्राटी सेवेत असलेले वासुदेवराव सपकाळ, माथाडी कामगार कैलासभाऊ मिसार, इतर कामगार म्हणून कामगार असलेले मोहनभाऊ पोथीवाल, विठ्ठलराव शेरेकर, सालारभाई सौदागर, सिद्धार्थभाऊ कळंबे यांचा शॉल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधी सल्लागार ऍडव्होकेट विशालजी पुजारी,असंघटित कामगार विभाग जिल्हा उपाध्यक्ष. श्री. अशपाक शेख, आर्वी तालुका अध्यक्ष श्री अशोकभाऊ धानोरकर, आर्वी शहर अध्यक्ष श्री. दिलीपकाका बोरकर, जिल्हा उपाध्यक्षा शुभांगीताई कलोडे, आर्वी तालुका अध्यक्षा माधुरीताई सपकाळ, कामगार तालुका अध्यक्ष रामचंद्र मारबते यांच्या हस्ते शॉल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी कामगार कल्याणा साठी सतत कामं करणारे गवंडी बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे सचिव सुरेंद्र वाटकर यांचा सुद्धा शॉल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व कामगारांना,कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या