आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : उपजिल्हा रुग्णालय येथे दर शनिवारला दाताचे डॉक्टर दांडी मारत असल्याचा आरोप बाहेर गावावरून येणाऱ्या पेशंटची होतोय गैरसोय सोमवार ते शुक्रवार पर्यंत दाताचे डॉक्टर असतात मात्र शनिवारी डॉक्टर दांडी मारत असल्याची अनेक रुग्णा मध्ये चर्चा होत आहे. शनिवारला सुट्टी न टाकता शनिवारला दाताचे डॉक्टर अमरावती येथे खाजगी दवाखान्यात सेवा देत असल्याचे सुद्धा चर्चा होत आहे. दवाखान्यात सर्व दाताचे इन्स्ट्रुमेंट व सोयी उपलब्ध असून सुद्धा इन्स्ट्रुमेंट नसल्याचे सांगून रुग्णांची थातूरमातूर तपासणी करून वापस पाठवतात अशी देखील रुग्णांची तक्रार आहे. परंतु याकडे प्रशासन व वैद्यकीय अधिकारी लक्ष देतील का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
———————————————
शनिवारी दाताच्या डॉक्टरची ओपीडी चक्क बंद
उपजिल्हा रुग्णालय येथील १५/०२/२०२५ ला दाताची ट्रीटमेंट करण्याकरिता रुग्ण आला असता दाताच्या रुग्णांनी ओपीडीची चिठ्ठी काढून दंत विभाग येथे गेले असता चक्क बंद असल्याचे दिसून आले इतर डॉक्टरांना विचारले असता दाताचे डॉक्टर शनिवारला सुट्टीवर असते असे सांगु लागले मात्र बाकीच्या डॉक्टरांना शनिवारी सुट्टी नसते व दाताच्या डॉक्टरला कसे सुट्टी राहते असा प्रश्न विचारला असता कोणी बोलायला तयार नव्हते परंतु इथे दाताचे इतरही रुग्ण येत असून गैरसोय होत असल्याचे दिसून आले. कदाचित डॉक्टर शनिवारला खाजगी दवाखान्यात सेवा देत असेल अशी देखील रुग्णांमध्ये चर्चा हाेत होती. अनेक रुग्णांच्या तक्रारी होत असून होत असलेल्या रुग्णाची गैरसोय थांबवावी व वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन होत असलेल्या त्रासापासून रुग्णांना न्याय द्यावा अशी तक्रारीच्या माध्यमातून विनंती केली आहे.