धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
मातोश्री S.K मोबाईल शॉपचे भव्य उद्घाटन
धामणगाव रेल्वे : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर मातोश्री S.K मोबाईल शॉप चे भव्य उद्घाटन नगर परिषद जवळ आज मंगलवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडले.

उद्घाटन कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन संपन्न झाले. नव्याने सुरू झालेल्या या मोबाईल शॉपमध्ये विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, अक्सेसरीज व सर्व प्रकारच्या मोबाईल सर्व्हिसिंग सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून अल्पोपहार व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे आयोजन विलास बुटले व सुधीर सेवानी यांनी केले असून त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या या उपक्रमास व्यापारी व नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

















