सीड बॉल्स-२०२४ रोपण कार्यक्रमात आपण सहभागी होत असल्याबद्दल आपले मनस्वी आभार व अभिनंदन.

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

देवराई फाउंडेशन पुणे यांच्या वसुंधरेला समर्पित मेहनत व कार्याच्या फलश्रुतीने देवराई अमरावती साकारत असलेल्या अमरावती जिल्ह्याकरिता नियोजित “सीड-बॉल्स प्रोजेक्ट-२०२४” करिता १०,००० (दहा हजार) सीड बॉल्स आपल्याला अमरावती येथे नुकतेच प्राप्त झालेत.

वड, पिंपळ, काटेसांवर, शेवगा व चिंच अश्या महाकाय वटवृक्षांमधे रुपांतरित होणाऱ्या ५ प्रजातींच्या बियांचा या सीड बॉल्स मधे समावेश करण्यात आला आहे.

येत्या २६ जून पासून आपल्यासारख्या नोंदणीकृत व्यक्ती / गट-समूह यांच्या तयार केलेल्या यादीनुसार सीड बॉल्स चे वितरण माझे हॉस्पिटल संजीवन नर्सिंग होम, जिल्हा परिषद समोर, कोर्टाजवळ, कॅम्प, अमरावती, येथून आपण सुरू करणार आहोत.

आपणास आम्ही त्यानुसार फोन करुन वितरणासंबंधीची माहिती देऊ.
वितरण करावयाचे सीड बॉल्स येथून घेऊन जाण्याची जबाबदारी आपली राहील.

यासोबत सीड बॉल्स रोपणासंबंधीचा व्हिडिओ आपणास पाठविण्यात येत आहे. आपण हा व्हिडीओ व या माहितीसोबत आपल्या सहकारी मित्रांना देखील पाठवून त्यांना बीज-गोळे रोपण कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रेरित करावे.

या वर्षीचा बीजरोपणाचा मुहूर्त दि. ३ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ होत आहे.
त्यामुळे आपण दि ३ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सीड बॉल्स रोपणांस सुरुवात करावी, ही आपणांस नम्र सूचना व अपेक्षा.

देवराई फाउंडेशन पुणे ही पंजीकृत संस्था असल्यामुळे त्यांच्या नोंदीकरिता आपण बीज गोळे रोपण करीत असलेल्या कार्यक्रमाचा तपशील, रोपणाची जागा, उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांची नावे व रोपणांच्या फोटोसह मला Whatsapp वर पाठवावी, ही आपणास नम्र विनंती.

डॉ राजेश शेरेकर

प्रकल्पाधिकारी:- देवराई अमरावती.
भूतपूर्व सचिव:- आय.एम.ए. अमरावती.
संचालक:- संजीवन नर्सिंग होम अमरावती
{मोबाईल क्र. :- ९४२३३१६०९५}

तांत्रिक बाबींकरिता संपर्क
देवराई अमरावती चे समन्वयक
श्री बिपिन देशमुख
+91 99226 94864

veer nayak

Google Ad