वाठोडा बु. ग्राम वासी व बालगोपाल तान्हा पोळा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तान्हा पोळा उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी कलाकृतीला प्राधान्य देण्यात आले. चित्रकला, सजावट, पारंपरिक खेळ यांसह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या मुलांना बक्षीस वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वृद्धी होण्यासोबतच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.
उत्सव यशस्वीतेसाठी गावातील पदाधिकारी, दानदाता, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मान्यवरांनी मनापासून सहकार्य केले. ग्राम वाशी यांनी एकदिलाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला अधिकच आकर्षक स्वरूप दिले.
शांततेत व पारंपरिक उत्साहात संपन्न झालेल्या या पोळा उत्सवाबद्दल समितीने व ग्रामस्थांनी सर्व सहभागींचे व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच पुढील काळात आणखी उपक्रम राबवून मुलांच्या कलागुणांचा विकास घडविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
✨ बालगोपाल तान्हा पोळा उत्सव समिती – वाठोडा बु. ✨