वर्धा येथे विदर्भ स्थरीय पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा संपन्न

0
148
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वर्धा : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ, वर्धा यांच्या वतीने दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी शांती निकेतन, नवी तालीम समिती, सेवाग्राम आश्रम येथे विदर्भ स्थरीय पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या मेळाव्याचे उद्घाटन महासंघाचे राज्याध्यक्ष श्री मोहनराव शिंगटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने पोलीस पाटलांना दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेमार्फत शासनाकडे करण्यात आलेल्या प्रलंबित मागण्या व त्यावरील पाठपुराव्याची माहितीही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ विभाग प्रमुख श्री किशोरजी सावंत, नागपूर विभाग प्रमुख श्री गणेशजी हटवार, अमरावती जिल्हाध्यक्ष श्री प्रवीणजी ठाकरे यांनी हजेरी लावून संघटनेच्या बळकटीसाठी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस पाटील श्री सुभाष खोबे, श्री कृष्णाजी मरघडे, श्री चंदनखेडे व श्री उईके यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री कमलाकर नेहारे (दारूबंदी), श्री अविनाश घोरपडे (शिक्षण), सौ. पल्लवी आमदरे (महसूल), श्रीमती वर्षा ठोंबरे व सौ. नम्रता गव्हाळे (महिला सक्षमीकरण) यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

महासंघाच्या कार्याला दिशा देण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतल्याबद्दल श्री ईश्वरजी ढोके, डॉ. यशवंतजी जयपूरकर, श्री प्रभाकरजी बहादुरे व श्री देविदासजी पारसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रमोद महाजन यांनी केले तर संचालन सौ. दिक्षा रंगारी यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून श्री धनराजजी बलवीर यांनी मार्गदर्शन करून नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानंतर महासंघ राज्याध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता सौ. नम्रता गव्हाळे यांनी आभार प्रदर्शनाने केली. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.

veer nayak

Google Ad