एस ओ एस कब्स धामणगाव रेल्वे येथे पुस्तका व्यतिरिक्त वास्तविक जीवनाचा अनुभव करण्यासाठी विद्यार्थ्यांची वीर हनुमान लाॅन येथे शालेय सहलीचे आयोजन

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक- १७ जानेवारी २०२६

एस ओ एस कब्स शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहल वीर हनुमान लॉन येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शालेय सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभव मिळतो.विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, शिस्त व सामाजिक जाणीव निर्माण होते.निसर्ग, ऐतिहासिक व सामाजिक स्थळांची माहिती प्रत्यक्ष पाहून समजते.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.हिरवळीने नटलेल्या वीर हनुमान लाॅनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळ, गाणी व मनोरंजनाच्या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.
सहलीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांची योग्य देखरेख केली. सहल सुरक्षित, शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासातून विरंगुळा मिळून ते ताजेतवाने झाले.

शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व पालकांच्या सहकार्यामुळे ही सहल यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीचे आयोजन प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदने, स्नेहल दुर्गे व ऋचा अडवलकर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad