इष्ठ मित्रांच्या उत्साही वातावरणात सेवापूर्ती सोहळा संपन्न
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथे दि. ३०/०८/२०२५ राेजी आयनाॅक्स हाॅल, साई नगर, आर्वी येथे सर्व इष्ठ मित्र व कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक श्री. नानाजी भुसारी यांच्या उपस्थितीत श्रीरामजी कडू यांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. अशा भावनेतून कार्यक्रम संपन्न झाला.
कै. नारायणराव वाघ विद्यालय चिंचोली डांगे येथून सहाय्यक शिक्षक पदावरून रजु दि. ०१/०७/२०९७ सेवापूर्ती दि. ३०/०८/२०२५ रोजी पूर्ण करत २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक कलोपासक भक्ती संगीत संच व मित्रपरिवाराने दिला थाटामाटात श्री श्रीराम शामरावजी कडू यांना शिक्षक सेवेतून निरोप देत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन राहूल राजनेकर सर यांनी केले, तर प्रास्ताविक अनिकेत भुसारी सर यांनी केले आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार गोविंद सावरकर सर यांनी मानले.