तळेगाव दशासर शंकर पटला सुरेश वाघमारे यांची भेट; अधिकाऱ्यांचा सत्कार

0
46
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर (ता. धामणगाव रेल्वे) येथे पारंपरिक व ऐतिहासिक शंकर पटाला माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी भेट दिली. या प्रसंगी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी भामरे साहेब तसेच तळेगाव दशासर येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार किरणजी आवटे साहेब यांचा माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव धनजोडे, भाजपा शहराध्यक्ष गजाननजी शेंद्रे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संजय सारवे, विनोद घुले, रविभाऊ चुटे, रमेशराव ठवकर, अमर सुरजुसे, भूषण जामवाले, योगेश आखरे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव तसेच भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार धनजोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शंकर पटाच्या निमित्ताने ग्रामीण संस्कृती व परंपरेचे जतन होत असून अशा उपक्रमांना प्रशासन व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.

veer nayak

Google Ad