तळेगाव दशासर शंकर पाटाला माजी खासदार रामदासजी तडस यांची सदिच्छा भेट

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर — येथील ऐतिहासिक व पारंपरिक शंकर पाटाला माजी खासदार रामदासजी तडस यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शंकर पाटाच्या परंपरेचे कौतुक करत ग्रामीण संस्कृती व परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव धनजोडे, तळेगाव दशासर भाजप अध्यक्ष गजानन शेंद्रे, रमेशराव ठवकर, डॉ. पहाडे, तळेगाव दशासर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय सारवे, रविभाऊ चुटे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार धनजोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी खासदार रामदासजी तडस यांनी शंकर पाटाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले. अशा पारंपरिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील संस्कृती, क्रीडा व सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीमुळे शंकर पाट परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

veer nayak

Google Ad