एस ओ एस कब्स धामणगाव रेल्वे येथे नववर्ष स्वागत समारंभ उत्साहात साजरा.

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक: ०२/०१/२०२६

” मना मनातून आज उजळले

 आनंदाचे लक्षदिवे..

 समृद्धीच्या या नजरांना

 घेऊन आले वर्ष नवे….”

एस ओ एस कब्स शाळेमध्ये नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या प्रार्थना सभेतून झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षानिमित्त सुंदर विचार मांडले. नव्या वर्षाचे स्वागत सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, परिश्रम व सद्गुणांनी करावे, असा संदेश देण्यात आला.

प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नववर्षात नवे संकल्प करून अभ्यासात प्रगती करावी, चांगले संस्कार आत्मसात करावेत व समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

वर्गखोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छता राखणे, ज्येष्ठांचा आदर करणे, वेळेचे नियोजन करणे व चांगली सवय अंगीकारणे असे संकल्प घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी आरोग्य, आनंद, यश व समृद्धी घेऊन येवो, अशी सदिच्छा व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे आयोजन प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदने, स्नेहल दुर्गे,ऋचा अडवलकर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad