सिप अबॅयकस अमरावती असामान्य मुलाच्या प्रतिगोगिता मध्ये ऋचा खडसे व विहान खडसे यांचे प्रावीण्य 

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती – संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सिप अबॅयकस चे वतीने मुलांना गणित चे पक्के ज्ञान व कोणतेही कॅल्क्युलेटर न वापरता एक अंकी पासून तर निरंतर अंकी पर्यंत गुणाकार, भागाकार, वजाबाकी ,अधिक व कंस व सर्व प्रकारचे गणित सोडविणे ह्या साठी सिप अबॅकस प्रसिद्ध असून अमरावती शहरात नुकतेच कॅम्प परीसरातील व साईनगर येथील शाखेच्या वतीने शुभ मंगल कार्यालय येथे लहान मुलांची प्रतियोगिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या

त्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय व चंपीयन असे पारितोषिक देण्यात येणार होते त्या साठी त्यांनी परीक्षा झाल्या नंतर शुभ मंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सिप अबॅकस चे कॅम्प परिसरातील उत्कृष्ठ शिक्षका सौ उर्मिला राठी यांनी आयोजित केली होती.

तसेच कार्यक्रमामध्ये सिप चे प्रदीप सर यांनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले तसेच ह्या महत्वाच्या कार्यक्रमात बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी भाऊ राणा यांनी मुलांना पारितोषिक दिले व सर्व सहभागी मुलांचे कौतुक केले आणि प्रथम क्रमांक मिळविणारी जी एम सी मध्ये कू.ऋचा रुपेश खडसे हिला पारितोषिक व बक्षीस देऊन आनंदाची थाप थोपटली व विहान रुपेश खडसे याने तृतीय क्रमांक पटकाविला मुळे त्याचे सुद्धा रवी राणा यांनी कौतुक केले ह्या कार्यक्रमात अमरावती शहराचे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ .रुपेश खडसे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व योग गुरू तेजस गोतरकर यांनी सूर्य नमस्कार करुन व्यायामाचे महत्व सांगितले तसेच ऍड सुयोग माथूरकर यांनी छान मार्गदर्शन केले व सर्व मुलांना अभ्यासात गणित तज्ञ होण्यास सिप अबॅकस आपल्या सोबत नेहमी असल्याचे सांगितले पालक यांनी कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला

veer nayak

Google Ad