श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे विविध उपक्रमासह “जागतिक महिला दिन” उत्साहात संपन्न. 

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी) 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील महिला कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे संयुक्त विद्यमाने “जागतिक महिला दिन” दिनाक ८/३/२०२५ रोजी विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.

महिला दिनाच्या कार्यक्रमाला विचार मंचावर सौ.सरीता जावकर अलिबाग, कृषी महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, प्राचार्य डॉ सी यु पाटील, महिला सेलच्या पदाधिकारी प्रा.वृषाली देशमुख, प्रा रेश्मा भेंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दीपक बोंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते. 

सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ. पंजाबराव देशमुख, परमहंस सद्गुरु श्री संत शंकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.

सर्वप्रथम प्रा. वृषाली देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये महिला दिन साजरा करण्याचा उद्देश, भारतीय महिलांचे विविध क्षेत्रातील केलेली प्रगती व सुयश याबद्दल माहिती प्रदान केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. सी. यु पाटील यांनी जागतिक महिला दिनाचे उचित साधून आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी सरीताताई जावकर यांनी महिलांनी खंबीर राहून शैक्षणिक, क्रीडाविषयक, राजनीति प्रगती साधण्याचे आवाहन केले. तसेच महिलांची औद्योगिक प्रगती व महिलांचे सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी घरगुती व सामाजिक हिंसाचार तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याचा सल्ला दिला. 

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये योगा व झुंबा डान्स, विविध क्रीडा स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी गोंडसे हिने केले. तर आभार प्रदर्शन कुमारी हर्षाली आडे यांनी केले. यावेळी कार्यक्रम स्थळी विविध रांगोळी पोस्टर सजावट गौरी खापणे, सानिका भुडे, वैष्णवी चीनक, श्रद्धा गावंडे यांनी केले. 

 महिला दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी एडवोकेट प्रकाशराव देशमुख, राजूभाऊ भोगे, प्राचार्य डॉ. सी. यू.पाटील, वृषाली देशमुख प्रा रेश्मा भेंडे, प्रा मनीषा लांडे, प्रा दीपिका निंबाळकर,प्रा. वैष्णवी बिजने,प्रा. कल्याणी जाधव, प्रा निकिता राऊत, आशिष लावरे, राम डोळस, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad