श्री संत शंकर महाराज गो संगोपन व संशोधन गोशाळा, श्री. क्षेत्र पिंपळखुटा येथे तालुकास्तरीय एक दिवसीय गो आधारित शेती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. 

0
88
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे वार्ताहर) 

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, धामणगाव रेल्वे त्यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय एक दिवसीय व आधारित शेती प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजन श्री संत शंकर महाराज गो संगोपन व संशोधन गोशाळा श्री क्षेत्र पिंपळखुटा येथे दिनांक ३०/१/२०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान करण्यात आले होते सर्वप्रथम गोशाळे मधील सर्व गोधनाची परमहंस सद्गुरू श्री संत शंकर महाराज व पशुसंवर्धन विभागातील सर्व पदाधिकारी यांचे द्वारे पूजन व महाआरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. 

 व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग बहादुरे, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त पंचायत समिती तालुका लघु पशुसंवर्धन चिकित्सालय चांदूर रेल्वे येथील डॉ. शशिकांत कानफाडे, महाराष्ट्र गोशाळा आयोग प्रतिनिधी श्री दिवाकर राव नेरकर, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे संजय मोरे, पशुधन विकास अधिकारी मंगरूळ दस्तगीर डॉ.मोहन गवई, पशुधन विकास अधिकारी तळेगाव दशासर डॉ तायडे मॅडम, पशुधन विकास अधिकारी धामणगाव रेल्वे चौधरी मॅडम,श्री. संत शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त, देवेंद्रजी वाल्हेकर, सुदामराव नागपुरे, श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे पदाधिकारी तथा गोशाळा व्यवस्थापन प्रमुख राजूभाऊ भोगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी यु पाटील उपस्थित होते. 

सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व भगवान श्रीकृष्ण तसेच परमहंस सद्गुरू श्री संत शंकर महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व ज्ञानामृत ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी डॉ शशिकांत कानफाडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश्य उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितला. तसेच उत्पादन वाढीसाठी दुधापासून तयार होणारे विविध पदार्थ करून विक्री करण्याचे आवाहन केले. यानंतर प्राचार्य डॉ सी यु पाटील यांनी उपस्थितना मार्गदर्शन केले. यावेळी पशुसंवर्धन विभाग सभापती सौ दुधे यांनी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. यानंतर डॉ बहादुरे यांनी शेतीचे जोडीला पशुपालन व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती साधण्याचे सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले. जेवणानंतर दुपारचे सत्र मध्ये प्रमुख वक्ते दिवाकर राव नेरकर यांनी गो पालनाचे विविध फायदे व शेतीचा जिवंतपणा टिकून ठेवण्यासाठी शेण,गोमूत्र ,गांडूळ खत, यांचे उपयोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक बोंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ संजय मोरे यांनी केले. 

यावेळी तालुक्यातील गोधन पालक, ग्रामस्थ, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, प्रामुख्याने उपस्थित होते. 

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण, सचिव राजेंद्र लुंगे, कृषी महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी राजूभाऊ भोगे,ऍडव्होकेट प्रकाशराव देशमुख, महादेवराव शिवनकर, प्रा. निलेश शेळके, श्री धीरज लव्हाळे, प्रमोद नागपुरे, आशिष लावरे, राम डोळस,डॉ. मोहन गवळी,डॉ. धनंजय डोबले ,डॉ. धवणे, श्री शरद रंगारी, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती धामणगाव रेल्वेचे सर्व कर्मचारी, गोशाळा व कृषी महाविद्यालय कर्मचारी,विद्यार्थी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad