धामणगाव रेल्वे,
श्रीराम शिक्षण संस्थेची वाटचाल ही केवळ दगडा विटांची इमारत नसून ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण दालन आहे तसेच संस्थेत फक्त आमच्या संचालकांचेच नव्हे तर संस्थेचा आत्मा असलेल्या शिक्षकांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे आज श्रीराम शिक्षण संस्थेच्या रूपाने दिसत असलेले वटवृक्ष संस्थेतील सर्व संचालकांसोबतच कर्मचाऱ्यांमुळे आहे कारण कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत लक्षात राहतो तो म्हणजे फक्त ” शिक्षक “असे प्रतिपादन श्रीराम शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व येथील प्रख्यात डॉक्टर अशोक भैया यांनी येथे केले
गुरुवारी स्वर्गीय नंदलाल कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथील शारीरिक शिक्षक संजय बाळापुरे यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते शाळेच्या प्रांगणात आयोजित उपरोक्त सेवा निवृत्ती कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम, शाळा समिती अध्यक्ष संजय राठी संचालक किशोर साकुरे, गोपाल भूत प्राचार्य अर्चना राऊत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संजय बाळापुरे व सौ. काजल बाळापुरे, श्रीराम विद्यालय सोनेगाव खर्डा येथील मुख्याध्यापक वासुदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना आपले अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव मेश्राम म्हणाले की, श्रीराम शिक्षण संस्थेची स्थापना अरुणभाऊ अडसड यांच्या सहकार्याने करण्यात आली या संस्थेच्या मार्फत अनेक ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण दान देण्याचे कार्य अविरत आहे संस्थेच्या यशस्वी वाटचाल मध्ये सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून नव्हे तर सेवाभाव म्हणून संस्थेमध्ये कार्य केल्यामुळे संस्था नावा रूपास आली आहे सत्काराचे उत्तर देत असतांना बाळापूरे यांना अश्रू आवरले नाहीत
यावेळी गोपाल भूत,कमल छांगाणी, ,प्राध्यापक वृंदा जोशी, राजेश बानाईत, रिया व आर्या बाळापुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बाळापूर यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे प्राचार्य अर्चना राऊत यांनी सांगितले
संचालन संजय जाधव आभार योगेश गायगोले यांनी व्यक्त केले
Home आपला विदर्भ अमरावती श्रीराम शिक्षण संस्थेची वाटचाल ही केवळ दगडा विटांची इमारत नसून ग्रामीण आणि...