दिनांक : 20/02/2026
आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथील वाणिज्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर बायस्कर उपस्थित होते. तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आनंद नरांजे व डॉ. प्रविण केचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विशाल मोकाशे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जितेंद्र बारूळकर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापना व आदर्श नेतृत्व यांवर स्फूर्ती गीते व भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी पोवाडे व देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण शिवमय करून टाकले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १२५ विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झाले होते.
प्राचार्य डॉ. बायस्कर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य व नेतृत्वगुणांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे विशाल मोकाशे सर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची इतिहासापासून शिकून आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली. विभागप्रमुख डॉ. नरांजे सर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, स्वाभिमान व आदर्श नेतृत्वाचे महत्त्व अधिक दृढ झाले.















