राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तान्हा पोळा. शेकडो बालकांची उपस्थिती….

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सर्वच बालकांना स्व.संध्या इंगळे स्मृती प्रित्यर्थ भगवद्गीता प्रदान…..

धामणगाव रेल्वे,

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बालगोपालांच्या आयोजित तान्हा पोळा मध्ये शेकडो बाल स्पर्धकांनी सहभाग दर्शविला यामध्ये प्रथम क्र. कु. मेधुरा चौधरी या बालीकेने पटकावले हिला सोन्याची साखळी पारितोषिक रूपाने प्रदान करण्यात आली दुसरे वेदांत विजय शिलार तिसरे ओम काळे व चौथा क्रमांकाचे वैभव किरसाम तसेच पाचवे पारितोषिक लक्षित जोशी सह ४१ बक्षीस वितरण करण्यात आले

 

 

याप्रसंगी स्वर्गीय संध्या इंगळे स्मृती प्रित्यर्थ प्रत्येकाला भगवद्गीता प्रदान करण्यात आली

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेची पूजन व स्व. नानाजी देऊळकर यांना अभिवादन करून करण्यात आली

श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमांमध्ये मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह निखिल मोहोड,प्रांत कार्यकारीणी सदस्य चंद्रशेखर राठी,इस्कॉन चे दिनेश बुधलानी, नगर सह कार्यवाह गौरव शिंदे, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बदनोरे, तर परीक्षक म्हणून प्रा.अमोल टेंभरे, कलाक्षेत्रात प्रख्यात अनंत मावळे, प्रा.कोमल सेवक, प्रा .सोनल मालपाणी उपस्थित होते

…………………………

सर्वच सहभागी स्पर्धकाला भगवद्गीता….

संघाच्या उपरोक्त तान्हा पोळा मध्ये सम्मिलित सर्वच बालगोपालांना राष्ट्र सेविका समितीच्या स्व. संध्याताई रामचंद्रजी इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवीण इंगळे यांच्याकडून हिंदी आणि मराठी भाषेत भगवद्गीता प्रदान करण्यात आल्यात हेच या तान्हा पोळ्याचे विशेष आकर्षण आणि उल्लेखनीय कार्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धकांच्या पालकांनी आदराने भगवद्गीता स्वीकारल्यात

————————-

संघाचे निरंतर राष्ट्रभक्तीचे कार्य … बुधलानी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निरंतर राष्ट्रभक्तीचे कार्य कौतुकास्पद असून तान्हा पोळा हे सुद्धा बालकांच्या कलागुणांना वृद्धिंगत व गोवंश आणि गोसेवे बाबत प्रोत्साहित करणारे गौरवास्पद कार्य असल्याचे इस्कॉनचे दिनेश बुधलानी म्हणाले

—————————–

तान्हा पोळा मध्ये सम्मिलित बालकांसोबत पालकांच्या अभिनंदन…निखिल मोहोड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय कार्यासोबतच बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणारा तान्हा पोळा हा कार्यक्रम सुद्धा विशेष उल्लेखनीय आहेच संघाच्या तान्हा पोळ्यामध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या बालकांसोबतच सर्व पालकांचे अभिनंदन असे विचार याप्रसंगी संघाचे जिल्हा कार्यवाह निखिल मोहोड यांनी व्यक्त केले

——————

शकुंतला ताई पाठक यांचा सत्कार… परंपरागत गेल्या ४०ते४५ वर्षांपूर्वीपासून गणपती, दुर्गादेवी, राधाकृष्ण, शंकर-पार्वती तसेच बालगोपालांसाठी मातीचे बैल तयार करणाऱ्या दत्तापूर विभागातील वृद्ध कलावंत शकुंतला बाई यादवराव पाठक यांचा याप्रसंगी सौ. मंगलादेवी चंद्रशेखरची राठी यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला

……………………

प्रास्ताविक व परिचय संयोजक कमल छांगाणी यांनी कार्यक्रमाचे संचालन दर्शन राठी व निखिल पनपालिया यांनी केले

veer nayak

Google Ad