आर.के. ज्ञान मंदिरम येथे सरदार भगतसिंग यांची जयंती साजरी

0
155
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

नाचणगाव, पुलगाव येथील आर .के.ज्ञान मंदिरम इंग्लिश मीडियम स्कूल येथे शहीद ए आजम सरदार भगतसिंग यांची जयंती साजरी यांची साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री.नितीन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रीती बिडकर व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे, सर्व शिक्षक व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती ची ज्योत प्रज्वलित करणारे महान प्रखर क्रांतिकारक व निस्सीम देशभक्त सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वांनी शहीद ए आजम सरदार भगतसिंग यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या सुरेख मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad