प्रतिनिधी धामणगाव रेल्वे
अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेद्वारा महिला मार्गदर्शन सोहळा व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता टीएमसी हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट चौक, धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की, घरी बसून महिलांना रोजगार व गृह उद्योग प्राप्त करून देणे .तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मदत करणे ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन अनेकांना प्रेरणा देणे, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा लोभ न करता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा संस्थांचा सत्कार घेऊन त्यांचे मनोबल वाढविणे व त्यापासून अनेकांनी समाजासाठी काही करण्याची प्रेरणा घेणे .दूषित वातावरणात वृक्षाची फार गरज आहे .त्यामुळे वृक्ष लागवड तसेच महिला मुक्ती मोर्चा हे महिलांसाठी संपूर्ण राज्यात अन्यायाच्या विरोधात लढत असल्याने महिलांना एकत्र करणे असा आहे .कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रताप अडसड आमदार धामणगाव रेल्वे विधानसभा, गिरीश ताथेड ठाणेदार दत्तापूर पोलीस स्टेशन तसेच प्रमुख उपस्थिती डॉ .अर्चना रोठे सामाजिक कार्यकर्ते ,अनिल साखरकर संपादक ए एस न्यूज महाराष्ट्र ,राजीव शिवणकर सहसंपादक ए एस न्यूज महाराष्ट्र डॉ.रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, पंकज जाधव जिल्हा प्रमुख लहुजी शक्ती सेना ,उमेश भुजाडणे उपजिल्हाप्रमुख लहुजी शक्ती सेना तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष ,अनिल सोनटक्के लहुजी शक्ती सेना संपर्क प्रमुख तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षदा प्रदीप राव घोम राष्ट्रीय अध्यक्ष अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था ,माला ताई वसंतराव दळवी, हर्षाताई सगणे, विजयाताई निस्ताने, संगीताताई तोंडे ,वर्षाताई तायडे ,अर्चनाताई पुंड ,ज्ञानेश्वर झोंबाडे, गौरव गवळी, गोपाल नारे संपादक दैनिक जागर मराठी ,प्रवीण झोलेकर सहसंपादक दैनिक जागर मराठी ,सरिता पोटफोडे ,विलास बुटले, डॉ. महेश साबळे, डॉ. आकाश येंडे ,डॉ. राजेश वटाणे ,अॅड. घनश्यामजी पुरोहित ,प्रवीण हेंडवे, विजयराव गायकवाड संपादक दैनिक सांध्य मतदार राज ,विनोद तिरले तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना ,राणीताई देशमुख, संजय सायरे ,नरेंद्र देऊळकर ,बाळासाहेब स्वर्गीकर ,पपीता मनोहरे ,सुनीता जगताप, सरोज आवारे ,विक्की बुधलानी, दिलीप दगडकर ,निखिल भन्साली, अशोक खरात अध्यक्ष महिला मुक्ती मोर्चा, संगीताताई वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला मुक्ती मोर्चा ,संगीता इंगळे जिल्हाध्यक्ष अमरावती महिला मुक्ती मोर्चा, बंडू पाचोळे, गोपाल भूत, गणेश वाकोडे, लक्ष्मी गावंडे, लक्ष्मण नायसे, राजेश सोसे, सोमेश्वर गुल्हाने ,सुनीता पळसपगार ,कादरभाई ,राजकुमार वानखडे ,अहमद शेख, नीता गोरखू ,आम्रपाली चौधरी जिल्हा संघटक अमरावती व महिला मुक्ती मोर्चा चे सर्व सदस्य व पदाधिकारी इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे . कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष वाघमारे अखिल भारतीय पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष तसेच महिला मुक्ती मोर्चा तालुका निरीक्षक, अनिल शर्मा सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी वैराग्यमूर्ती प्रतिनिधी ,डॉ. मोहन बामनोटे ,डॉ. किशोर बोमनोटे ,डॉ. विनोद देशमुख ,निलेश चवरे, शरद देवगिरकर, अतुल भुजाडणे समीर शिंदे ,गोपाल परडके यांनी केले आहे.