डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय  पिंपळखुटा येथे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२५ वी जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था  व श्री शिवाजी कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या वतीने हे वर्ष भाऊसाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने भाऊसाहेबांचे जीवन व कार्यावर आधारित व्याख्यान दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले.

हा कार्यक्रम डॉ. नंदकिशोर चिखले, प्रमुख वक्ते डॉ. महेंद्र मेटे,  प्रा. धिरज कदम , प्राचार्य वृषाली देशमुख,  माजी प्राचार्य डॉ सी यू पाटील, प्रा. दीपक बोंद्रे, कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद नायक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

डॉ. पंजाबराव देशमुख हे भारतातील शेती, शिक्षण, आणि समाजसेवेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे अग्रणी नेते होते. या व्याख्यानात त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. मान्यवर वक्त्यांनी डॉ. देशमुख यांची शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी विकासातील भूमिका सविस्तर उलगडून दाखवली. हा कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरित करण्यासाठी एक प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा निकिता राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राजेश इंगोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नंदूशेठ चव्हान, कृषी महाविद्यालयाचे सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, श्री राजू भाऊ भोगे, प्राचार्य सौ वृषाली देशमुख,प्रा. एन. आर. शेळके,प्रा के. जी. जाधव,  प्रा एन एस राऊत,  प्रा आर डी इंगोले, श्री पवन रुद्रकार,श्री. राम डोळस, श्री. सागर शेंडे, श्री एन. एन. हलमारे, श्री एस. एस. आप्तुरकर आदी सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थीनींचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad