जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भाजपाच्या अमरावती जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्योती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे अत्यंत गरजेचे असून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी ज्योती पाटील यांनी केले. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.

सदर आरोग्य शिबीर डॉ. सविता मनीष अब्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय सल्ले देण्यात आले. विविध आजारांबाबत जनजागृती करत महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.













