राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे — राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कृष्णा नगर येथील स्वामी विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी परिसरात प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमास पुष्करना नगर, धामणगाव रेल्वे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण करून युवकांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. स्वामीजींच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.


यावेळी गोपाल मोकलकर, अखिलेश पोळ, प्रकाश चव्हाण, गजानन देशमुख, नितीन गांधी, उमेश दार्वेकर, गोपाल पेडीवाल, रोशन टाले, वानखडे, चांदुरकर फाटे, विलायतकर देशमुख, उमेश बोके, फरकाडे सर, तुषार म्हात्रे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता केली.

veer nayak

Google Ad