28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतीयासाठी गौरव दिन आहे. कारण भारतीय वंशाचे थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी रामन इफेक्ट या शोधाचे संशोधन केले. व या शोधा प्रित्यर्थ 1930 मध्ये त्यांना जागतिक सर्वोच्च पुरस्कार नोबेल पुरस्कार देण्यात आला. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विज्ञान दिन साजरा करण्यामागील कारण म्हणजे विद्यार्थ्यांनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा होय. प्रत्येक प्रसंग वस्तू गोष्ट याकडे डोळसपणे पाहणे निरीक्षणवृत्ती वाढविण्यासाठी दि.28 फेब्रुवारीला श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे येथे वर्ग 5 ते 7 चे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आशिष कुमारजी राठी, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ . शोभादेवी प्रकाशकुमारजी राठी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे मॅडम , यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीचे चार दालनात विभागणी करण्यात आली. दालन 1 मध्ये 60 ,दालन 2 मध्ये 56, दालन 3 मध्ये 53, दालन 4 मध्ये 57 प्रतिकृती होत्या. वर्ग 5-35, वर्ग 6-32 , वर्ग 7-40 प्रतिकृती अशा एकूण 107 प्रतिकृती होत्या. विद्यार्थिनीनी 5 ते 7विज्ञानावर आधारीत प्रकाशाचे परावर्तन, पिन होल कॅमेरा, न्यूटन्स लॉ, पचनसंस्था, श्वसनसंस्था, गणितीय बाग फॉर्म्युले अशाप्रकारे अनेक प्रतिकृती तयार केल्या. विद्यार्थिनीमध्ये होळी सणामध्ये रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी वडगिरे सर व सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक रोशन ठवकर, साळुंखे,यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेने अतंर्गत विद्यार्थिनींनी स्वतः नैसर्गिक वस्तूंचा वापर करून स्वतः रंग तयार केले. इतर विद्यार्थिनी प्रोत्साहित होण्यासाठी रंग प्रदर्शनीत ठेवण्यात आले.या प्रदर्शनीचे आयोजन करण्यासाठी शाळेच्या मुखाध्यापिका सुनीता देशपांडे मॅडम उपमुख्याध्यापक राठोड सर ,पर्यवेक्षिका टेंभुर्णे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थिनीना प्रतिकृतीसाठी मार्गदर्शन केले.

















