आर्वी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, नळ सोडण्याची वेळ निश्चित करा, व अवास्तव बिल रद्द करा अन्यथा उग्र आंदोलनास तय्यार रहा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचाराचे -आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, यांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला गर्भित इशारा उपविभागीय अभियंता दौऱ्यावर असल्याने, कनिष्ठ अभियंता श्री इंगळे यांनी खालील आशयाचे निवेदन स्वीकारले
आर्वी : प्रभाग क्रमांक 3 जनता नगर, मेहेर नगर, तसेच शहरातील इतर प्रभाग व वॉर्ड, संजय नगर, आंबेडकर वॉर्ड, पंचवटी रामदेव बाबा वार्ड , महाराणा प्रताप वॉर्ड,स्टेशन वॉर्ड,विठ्ठल वार्ड, वडर पुरा,नेताजी वार्ड,राष्ट्रसंत वार्ड, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हात मजुरी करणारे,मोलमजुरी करणारे नागरिक नागरिक वास्तव्यास राहतात, वरील वार्ड मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळे, व वेळेची कोणतीही निश्चिती नसल्यामुळे, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चा गलथाण कारभारामुळे आलेली आहे, उपरोक्त नमूद प्रभाग व वॉर्ड मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या पाईपलाईन मधून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.
आपल्या विभागाला नागरिकांकडून निवेदन, पत्र, विनंती अर्ज,प्रत्यक्ष भेटी देऊन सुद्धा आपल्या विभागाकडून कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नाही, किंवा त्यांच्या पत्र प्रपंचाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आपण दिलेला नाही, वरील नमूद वार्ड व प्रभागांमध्ये नळ सोडणाऱ्या सुपरवायझरला विचारना केली असता, टाकीच भरली नाही, इलेक्ट्रिक नव्हती,टाकी मध्ये पाणी चढत नाही , असे टाळा टाळी चे उत्तर दिले जातात, किंबहुना फोन उचलला जात नाही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या नवीन पाईपलाईन वर कोट्यावधीचा खर्च झाला, नवीन टाकी,नवीन यंत्रणा, उभारल्या गेली, तरी अशा पद्धतीचे उत्तर, हे शासन -प्रशासन,जनता व सरकारच्या पैशाची लुटमार झाल्याची कल्पना देते, नुकतीच उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, नागरिकांच्या पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन, सदर समस्या युद्ध पातळीवर सोडवण्यात यावी, आर्वी शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असताना, आपण अडचणी दूर करण्याऐवजी दुर्लक्ष करणे हा प्रकार संताप जनक आहे, तात्काळ प्रभावाने कारवाई करा, व सर्व समस्या युद्ध पातळीवर सोडवा, अन्यथा नागरिकांसह अजित दादा पवार विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात विचार केला नसेल असे उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारल्या शिवाय राहणार नाही.
असा इशारा या निवेदनातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व सैनिकांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासन प्रशासन आर्वी व वर्धा जिल्हा माजीप्रा कार्यालयाची राहील अस स्पष्ट केले आहे, यावेळी आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, आर्वी तालुका अध्यक्षा माधुरी सपकाळ, व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या प्राप्त 17तक्रारी चा प्रति सोबत जोडल्या असून यांच्या प्रतिलिपी. लोकप्रिय आमदार सुमितदादा वानखेडे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी वर्धा, कार्यकारी अभियंता म. जी. प्रा.वर्धा यांना पाठवण्यात आल्या आहे.