आर्वी,प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी : दि. ०३/०१/२०२६ ला नगरपरिषद आर्वी येथे सौ स्वाती प्रकाश गुल्हाने यांचा थाटामाटात पदभार सोहळा संपन्न.
आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात भाजपचे निवडून आलेले नगराध्यक्षा सह १४ नगरसेवक यांनी गांधी चौक येथून तेलंगराय महाराज यांना नतमस्तक होऊन ढोल ताशाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी चौक येथे पायदळ येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माला अर्पण केले व नगर परिषद येथे आले असता न.प.मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड यांनी सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे गेटवर स्वागत केले तसेच या सोहळ्याला मंचावर न.प. मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड,आमदार सुमित वानखेडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती प्रकाश गुल्हाने, मा. नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुल्हाने, मा. नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, भाजपा शहराध्यक्ष राहुल गोडबोले, गटनेता संजय थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप पोटफोडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रा. पंकज वाघमारे, अॅड. साै. क्षितिजा सुमीत वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित हाेते.


नगराध्यक्ष पदभार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत न. प. मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांचे हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांचे भारताचे संविधान प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच आर्वीकर जनतेने माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून १४ भाजपच्या उमेदवारांवर विश्वास टाकुन विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जी जबाबदारी दिली त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी भाषणातून सांगितले.
तसेच माजी नगराध्यक्ष वसंतराव गुल्हाने यांनी सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
तसेच विरोधी पक्ष नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज वाघमारे यांनी मी विरोधी पक्ष नेता जरी असलो तरी आर्वीच्या विकास कामात मला कुठलाही विरोध नाही मी नगराध्यक्ष व आर्वीच्या विकासा सोबत आहे असे भाषणातून सांगितले.
तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. स्वाती प्रकाश गुल्हाने यांनी आपल्या भाषणातून सुमित दादा वानखेडे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली व १४ नगरसेवका सह आर्वीकरांच्या आशीर्वादाने निवडून आनले. तसेच त्यांनी त्याबद्दल सर्वांचे आभार मानत दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडेल असे पदभार घेत असताना सांगितले. यावेळी सर्व पत्रकार बंधू व मोठ्या संख्येने मान्यवर आर्वीकर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.















