चांदुर रेल्वे / 15 ऑगस्ट ची पूर्वतयारी करण्याकरिता करिता चांदुर रेल्वे पंचायत समिती कार्यालयाचे मुख्य गेट 14 ऑगस्ट पासूनच बंद करण्यात आले,
जेणेकरून पूर्व तयारी करीत असताना या कार्यालयात कामानिमित्त येणारे लोकांच्या वाहनामुळे पूर्वतयारीत अडथळा निर्माण व्हावा नाही, पण यावेळी मात्र या कार्यालयात कार्यरत कर्मचारी अधिकारी तसेच ठेकेदार यांचे सर्वे वाहने गेटच्या आत मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते, व सर्वसामान्य लोकांचे वाहने मात्र मुख्य गेट बंद असल्या कारणाने त्यांना बाहेर ठेवावे लागत आहे, 15 ऑगस्ट चे पूर्वतयारी करण्याकरिता गेट बंद असणे हे महत्त्वाचे आहे कारण यावेळी कार्यालयाच्या प्रांगणात तोरणे बांधाने, लाईनीची आखणी करणे असे महत्त्वाचे काम राहतात
त्याकरिता कार्यालयाचे मुख्य गेट बंद असणेही महत्त्वाचे आहे पण कर्मचारी ठेकेदार यांचे वाहने मात्र गेटच्या आत मध्ये लावणे हा पंचायत समिती विभागाचा दुपटीपणाचे कोडे मात्र सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे, एकीकडे कर्मचारी ठेकेदार यांना वेगळी वागणूक व आपल्या कामानिमित्त या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य माणसांना वेगळी वागणूक सध्या पंचायत समिती विभाग चांदुर रेल्वे देत आहे,