चांदूर रेल्वे तहसील प्रतिनिधी
चांदूर रेल्वे तहसीलपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा येथील उपोषणकर्ते २५ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते, त्यांच्या शेतजमिनी कडे जाणाऱ्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी उपोषण सुरू होते.माजी आमदार आणि काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नांमुळे २६ फेब्रुवारी रोजी उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांना शरबत पाजून व उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडून दिलेल्या पत्र वरून उपोषण सोडविण्यात आले.

शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी मांडवा गावातील लोकांनी २५ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ज्यामध्ये तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी न करता आणि कोणतीही माहिती न घेता दिलेल्या आदेशांविरुद्ध उपोषणकर्त्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले या मध्ये मांडवा गावातील किसन इंगोले आणि इतर उपोषणकर्ते मागिल २ दिवसापासून उपोषणाला बसले होते यासाठी २६ फेब्रुवारी रोजी माजी आमदार काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांशी चर्चा करून मांडवा गावातील उपोषणकर्त्यांना न्याय देण्याबाबत आणि त्यांना शेतीसाठी रस्ता देण्याबाबत बोलले केले त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र दिले आणि ५ मार्च रोजी तहसीलदार, पोलिस विभाग, भूमी अभिलेख अधिकारी, विभागीय अधिकारी, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष यांनी मांडवा गावात घटनास्थळी जाऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार घटनास्थळाची पाहणी करावी आणि शेतकरी आणि मांडवा गावातील लोकांना न्याय द्यावा व रस्ता मोकळा करून घ्या
असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले, त्यानंतर उपोषणकर्ते किसन इंगोले, विठ्ठल परकाडे, दिनेश बेलसरे, अवधूत भौमकाळे, देवराव तिरमारे, सुनील सोनवणे, मुकिदा गडलिग, सागर फरकाडे, माहुलकर व इतर शेतकऱ्यांनी माजी आमदार काँग्रेस नेते विरेंद्र जगताप ,नायब तहसिलदार अजय बनारसे,अंकुश चवरे यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण सोडले यावेळी काँग्रेसचे तहसील अध्यक्ष अमोल होले, प्रफुल्ल कोकाटे, मांडवा सरपंच प्राजक्ता अनिल इगोले, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील कोयरे, इंदरपाल बनसोड, बाळासाहेब परकडे, नंदू पानपलिया, जितू ठाकूर, अनिल इंगोले, शिटटू सुर्यवंशी,श्रीनिवासन सूर्यवंशी, स्वप्नील मानकर, पंकज मेश्राम,वैभव मलवार ,तसेच काँग्रेस कार्यकर्ते व मांडवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















