शेतकऱ्याची 500 एक्कर च्या वर वर जमीन राहू शकते पडीत कारण नाला खोली करत असताना शेतकऱ्याच्या 10 मीटरच्या रस्त्यावर फक्त 2 गटर पायल्या टाकल्या पण नाला हा मोठा असल्या मुळे त्या वाहून गेल्या
आणि कोणत्याही काम करताना एका पद्धतीने केले पाहिजे पण वडगावजिरे येथील काम हे 100% नियमबाहय झाले आहे या मध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे काम अंदाजपत्रक ( इस्टिमेट ) पलीकडे होत आहे या मध्ये 9 मीटर लांबी 2 मीटर खोली आहे पण वास्तविकते मध्ये काम हे फक्त 5 ते 6 मीटर लांबी व 1 ते 1.5 मीटर खोली कुठे कुठे तर 0.5 म्हणजे 1.5 फूट खोली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून पाणी निघण्या साठी पाईप टाकले नाही आणि साठवण बंधाऱ्याच्या काम मध्ये सुद्धा सिमेंट बोगस वापरले आणि डस्ट जास्त प्रमाणात वापरली रेती हि एकदम खराब म्हणजे नाल्याची वापरण्यात आली आहे एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असताना अधिकारी वर्ग हा कुंभकराच्या झोपीचे सोंग घेत आहे आणि कॉन्ट्रॅक्टर ला पोटाशी घालत आहे अशातच या कामाची माहिती स्थानिक गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी नितीन कदम यांना सांगितलं व माहिती मिळताच क्षणाचा विलंब न करता नितीन कदम यांनी कमावर्ती धाव घेतली व शेतकऱ्याची समस्या जाणून घेतली व अधिकारी यांची काणचेपी केली व शेतकऱ्यांना तात्पुरती पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर अधिकारी करून देणार याची हमी दिली