भजन, कीर्तन,संत श्री सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत रथयात्रेसह निघाली मिरवणुक
पारंपारिक पोशाखात महिलांनी डोक्यावर कलश घेऊन घेतला मिरवणुकीत सहभाग
तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम
धामणगाव रेल्वे,ता.१६:- तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान शहरात प्रथमच भजन, कीर्तन संत सेवालाल महाराजांच्या नामाचा जयघोष करीत रथयात्रेसह मिरवणूक काढण्यात आली.यात पारंपारिक पोशाखात महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
तालुक्यात अनेक ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अनेक ठिकाणी करण्यात आले. प्रथमच धामणगाव येथे संत सेवालाल महाराज यांची रथयात्रेसह मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक माताजी मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ,संत गजानन महाराज मंदिर ते तुळजा भवानी माता मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघाली. यावेळी मोठ्या संख्येत बंजारा बांधव यावेळी पारंपरिक वेशभुषेत महिला ने डोक्यावर कलश घेवुन महिलानी सहभाग घेतला होता तसेच, पुरुष ,बालक बालिका व इतर समाज बांधवही मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. भजन, कीर्तन,संत श्री सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान येथील तुळजाई मंदिरात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायक प्रमुख वसंत राठोड हे होते.प्रमुख अतिथी म्हणून दत्तापुर येथील ठाणेदार गिरीश ताथोड,कारभारी अंबादास जाधव,शकील अहमद,मंगेश राजनकर,गोविंद मानकर,पुंडलिक मेश्राम,संतोष वाघमारे,ज्येष्ठ नागरिक कनिराम आडे व आदी उपस्थित होते.संचालन सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर राठोड यांनी मानले.यावेळी श्री मेघावत, अरुण आडे,शेषराव चव्हाण,मधुकर राठोड, सेवादास राठोड,विजय आडे,विष्णू राठोड,सचिन चव्हाण,रवी राठोड, श्रीकृष्ण चव्हाण,अरुण पवार,बाळू राठोड,जीवन पवार,राजू पवार, किशोर जाधव,सतीश राठोड,प्रदीप पवार,डी.जे. राठोड, शेषराव चव्हाण,रवी पवार, निरंजन आडे,भगवान चव्हाण,अरुण चव्हाण, रवी पवार,विलास राठोड, तेजस राठोड,ज्ञानेश्वर राठोड,नामदेव जाधव, बलदेव चव्हाण,शक्ति राठोड,रवी चव्हाण,नामदेव राठोड,के.टी.चव्हाण, जगदीश राठोड,गणेश राठोड,राम राठोड यांच्यासह धामणगाव रेल्वे तांड्यातील सर्व बंजारा बांधव व भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.
———–
सत्य, सेवाभाव व त्यागाचे प्रतीक संत श्री सेवालाल महाराज – गिरीश ताथोड
सत्य,सेवाभाव व त्याग अशी मानवतावादी शिकवण देणारे, भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जागृती निर्माण करणारे संत श्री सेवालाल महाराज होते.बुद्धीप्रामाण्यवादी संत अशी त्यांची ओळख होती. त्यांनी मार्ग चुकलेल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी जीवनभर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी दिलेली शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे विचार समानता, पर्यावरणसंवर्धन, माणुसकी, शिक्षण आणि समाजातील एकात्मता यांवर आधारलेले होते. त्यांनी दिलेली संघर्षमय आणि तत्त्वनिष्ठ जीवनाची शिकवण संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. असे ठाणेदार गिरीश ताथोड म्हणाले.
——–