धामणगाव रेल्वे,ता. :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माया वानखडे यांची अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समितीमध्ये बदलीने पदस्थापना प्रशासना कडून करण्यात आली आहे.दरम्यान पंचायत समिती कर्मचारी, अधिकाऱ्यांतर्फे त्यांना निरोप देण्यात आलं.यावेळी त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करून सत्कार करण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात माया वानखडे यांची अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समितीच्या बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.दरम्यान त्यांचा निरोप सोहळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारला (ता.१) पार पडला.यात त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय गुल्हाने,गजानन सांगळे,सहाय्यक लेखाधिकारी अमोल गोफणे, कृषी अधिकारी श्री सावळे, कृषी विस्तार अधिकारी श्री खंडेझोड कनिष्ठ लेखाधिकारी श्री कापकर, कनिष्ठ अभियंता प्रवीण आखरे,अभिजीत कल्ले विस्तार अधिकारी पंचायत मीना मसतकर,विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री मिसाळ, स्थापत्य अभियांत्रिक सहायक शशांक जारी,अजिंक खेर्डे श्री बनपट्टे,वरिष्ठ सहाय्यक प्रकाश महात्मे,गजेंद्र काळे, श्री काश्टे, संजय चव्हाण, सचिन गायकी कनिष्ठ सहाय्यक श्री चव्हाण,अमोल कावरे,पंकज यादव,मंगेश राऊत,लखन चव्हाण, प्रशांत मनवर,श्री वानखेडे, मोबीन खान,सोनाली कडू,श्रीमती सुलताने, मीनल पाटील,श्रीमती राठोड,श्रीमती हुमणे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील केणे,ग्राम विकास अधिकारी राजू अहिरवार,सचिन तसर, स्वच्छ भारत मिशन जलजीवन मिशन मधील प्रेमकुमार अंबुलकर, विशाल सुटे,राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान परिचर संघटना रवींद्र देशमुख, बंडू वैरागडे,राजू पांडे,हेमलता परमार,राजू पवार,राजू राजू शिरसोदे,ऋषिकेश ढोले, सरपंच संघटना,रोजगार सेवक, केंद्र चालक संघटना व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचालन विशाल सुटे यांनी केले.
———